
उल्हासनगर : गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली 125 वाहने ही अनेक वर्षे पडून असल्याने त्यांना गंज लागला असून त्यातून येणाऱ्या दुर्गंधी मुळे पोलिसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांत या 125 भंगार वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.