मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

Sachin-Tendulkar
Sachin-Tendulkar

मुंबई: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला २७ मार्चला कोरोनाची लागण झाली. सचिनने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती. सचिनने म्हटले होते की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी योग्य ती काळजी घेत आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं असून चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझ्या व्यतिरिक्त घरातील इतर सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आहे. त्यानंतर आज सचिनला रूग्णालयात दाखल करण्याची आल्याची माहिती सकाळी मिळाली.

सचिनने स्वत: ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली. "तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि सदिच्छांसाठी तुमचे आभार. वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून मला नुकतंच रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांतच मी ठणठणीत होऊ घरी परतेन अशी मला आशा आहे. सर्वांनी आपापली काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे", असं सचिनने ट्वीट केलं.

२०११च्या विश्वचषक विजयाला आज १० वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून सचिनने त्या आठवणी जागवल्या. तसेच, विश्वविजेत्या संघातील खेळाडूंना आणि चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, सचिनला २७ मार्चला कोरोनाची लागण झाली होती. 'मी सध्या घरीच क्वांरटाइन असून कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱी आणि मला आधार देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो, सर्वांनी काळजी घ्या' असं आवाहन सचिनने त्यावेळी केलं होतं.

सचिनच्या आधी अनेक दिग्गजांना कोरोनाची लागण झाली. पण महत्त्वाचे म्हणजे सचिनला कोरोना झाल्यानंतर काही दिवसांतच युसूफ पठाण आणि त्यानंतर इरफान पठाण या दोन माजी क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजले. हे तिघेही वर्ल्ड रोड सेफ्टी सिरीज या स्पर्धेत एकाच संघाकडून खेळले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com