मनसुख हिरेन हत्या कटाचा सूत्रधार प्रदीप शर्मा : एनआयए | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mansukh

मनसुख हिरेन हत्या कटाचा सूत्रधार प्रदीप शर्मा : एनआयए

मुंबई: अँटेलिया स्फोटक प्रकरणातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या कटाचा खरा सूत्रधार माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आहे. बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेने त्याला तब्बल ४५ लाख रुपयांची सुपारी दिली होती, असा खळबळजनक दावा आज ‘एनआयए’ने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

अनेकदा पोलिस आयुक्तांच्या कार्यालय परिसरातच अनेक बैठका घेण्यात आल्या. वाझेने त्या कामासाठी त्याला सुमारे ४५ लाख रुपये दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. मागील वर्षी ५ मार्चला हिरेनयांचा मृतदेह ठाणे खाडीत आढळला होता.

Web Title: Sachin Vaze Paid Money To Pradeep Sharma In Mansukh Hiren Murder Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top