esakal | वाझेच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करा! | Sachin Waze
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin waze

वाझेच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अँटीलिया स्फोटक प्रकरणातील (Antlia explosive case) प्रमुख आरोपी सचिन वाझेने (Sachin waze) घरी नजरकैदेत ठेवण्याच्या केलेल्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court) राष्ट्रीय तपास पथकाला (NIA) आज दिले.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

वाझेवर नुकतीच खासगी रुग्णालयात हृदयशस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतरच्या देखभालीसाठी मला माझ्या स्वतःच्या घरात नजरकैदेत राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वाझेने उच्च न्यायालयात केली. विशेष न्यायालयाने त्याची ही मागणी यापूर्वी फेटाळली आहे. त्यानंतर आता त्याने उच्च न्यायालयात ॲड. सुदीप पासबोला यांच्यामार्फत याचिका केली आहे.

बुधवारी (ता. ६) न्या. नितीन जामद आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. वाझेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून सध्या तो तळोजा कारागृहात आहे; मात्र कारागृहातील रुग्णालयाची अवस्था बिकट असून तिथे अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे त्याला देखभालीसाठी घरी नजरकैदेत ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

loading image
go to top