Sachin Waze | 'त्या प्रकरणात मी फक्त प्यादा,' वाझेचा चौकशी समितीसमोर खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin-Waze-woman

'त्या प्रकरणात मी फक्त प्यादा,' वाझेचा चौकशी समितीसमोर खुलासा

अँटेलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला सचिन वाझेने चौकशी समितीला संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. वाझेला कोरोना काळात सेवेत घेतल्यानंतर पुन्हा बडतर्फ करण्यात आलं होतं. सध्या त्याच्यावर चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणातील 'एक प्यादं' असल्याचं वाझेने चांदिवाल समितीला सांगितलंय. आपल्यावर विश्वास असल्याचं वाझेने समितीला सांगितलं आहे. उद्या त्याची उलटतपासणी होणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. देशमुख खंडणी वसूल करण्यासाठी वाझेचा वापर करत होते, असा आरोपही करण्यात आला. सध्या परमबीर सिंगांना फरार घोषित करण्यात आलंय. तर वाझे सध्या कारागृहात आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे.

loading image
go to top