esakal | अँटेलियाजवळ स्कॉर्पिओ ठेवताना कुठे होता सचिन वाझे, NIAला मिळाली मोठी माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

अँटेलियाजवळ स्कॉर्पिओ ठेवताना कुठे होता सचिन वाझे, NIAला मिळाली मोठी माहिती

एका पोलिस चालकासह दोन चालकांच्या मदतीने स्कॉर्पिओचा प्रवास गुन्ह्यात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अँटेलियाजवळ स्कॉर्पिओ ठेवताना कुठे होता सचिन वाझे, NIAला मिळाली मोठी माहिती

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान अँटेलियाजवळ स्कॉर्पिओ ठेवताना वाझे घटनास्थळी उपस्थित अशी माहिती समोर आली आहे. एका पोलिस चालकासह दोन चालकांच्या मदतीने स्कॉर्पिओचा प्रवास गुन्ह्यात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही स्कॉर्पिओ क्रॉफर्ड मार्केट येथील पोलिस आयुक्तालयात तीन दिवस होती, अशी माहितीही समोर आली आहे. 

अँटेलिया बंगल्याजवळ जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ कार पार्क करताना वाझे स्वतः इनोव्हा कारमध्ये घटनास्थळी उपस्थित असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) तपासात निष्पन्न झालं आहे. या कारचा प्रवास विक्रोळीपासून ठाण्यातील साकेत सोसायटी आणि त्यानंतर अँटेलिया बंगला असा होता. या प्रवासात एक खासगी आणि एका पोलिस चालकाचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आलं आहे. 

आरोपींचे  जबाब एनआयएने नोंदवले आहेत. गंभीर बाब म्हणजे चोरीच्या तक्रारीनंतर तीन दिवस स्कॉर्पिओ कार पोलिस आयुक्तालयात पार्क करण्यात आली होती, असे सूत्रांनी सांगितले. 17 फेब्रुवारीला विक्रोळी पूर्व येथे कारची स्टेअरींग जाम झाल्यामुळे तेथेच सोडली. 17 फेब्रुवारीला विक्रोळी येथे सोडून मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटला आले. तसंच 18 तारखेला वाझेने एका चालकाच्या मदतीने ती स्कॉर्पिओ कार विक्रोळीवरून ठाण्यातील वाझे यांच्या घरी साकेत सोसायटीमध्ये आणली, असं तपासात पुढे आलं आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

18 फेब्रुवारीला ती कार साकेत सोसायटीमध्ये ठेवल्यानंतर 19 फेब्रुवारीला ती कार पोलिस आयुक्तालयात आणण्यात आली. तेथे तीन दिवस ही कार ठेवण्यात आली.  21 फेब्रुवारीला ही कार पोलिस आयुक्तालयातून पुन्हा साकेत सोसायटीत नेण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारीला रात्री ही कार तेथून निघाली आणि त्यानंतर ती अंबानी यांच्या अँटेलिया बंगल्याजवळ ठेवण्यात आली. या सर्व कारच्या प्रवासासाठी दोन चालकांचा वापर करण्यात आला आहे. त्यातील एक चालक पोलिस दलातील आहे.

तर एका खासगी चालकाचा वापर करण्यात आला आहे. या दोनही चालकांचा जबाब एनआयएने नोंदवला आहे. ही कार अँटेलिया बंगल्याजवळील कारमायकल रोड येथे ठेवण्यात आली. त्यावेळी वाझे स्वतः इनोव्हा कारमध्ये घटनास्थळी उपस्थित होते, असे त्यातील एका चालकाने जबाब दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Sachin Waze present while placing Scorpio near Antelia revealed NIA investigation