esakal | १०० कोटी खंडणी वसुली: सचिन वाझेचा 'ईडी'ने जबाब नोंदवला
sakal

बोलून बातमी शोधा

sachin-waze 2.jpg

१०० कोटी खंडणी वसुली: सचिन वाझेचा 'ईडी'ने जबाब नोंदवला

sakal_logo
By
अनिश पाटील

१०० कोटी खंडणी वसुली: सचिन वाझेचा 'ईडी'ने जबाब नोंदवला

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालय (ईडी) तपास करीत असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आज बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा जबाब नोंदवण्यात आला. नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हा जबाब नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची पडताळणी वाझे कडून करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (Sachin Waze Statement Recorded by ED in 100 Crores Extortion Case Parambir Singh Letterbomb)

हेही वाचा: "आम्ही भाजप नेत्यांना 'चंपा' किंवा 'टरबुज्या' म्हणणार नाही"

परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. अनिल देशमुख तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होते. त्या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेत मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते. याबाबत वाझेला प्रश्न विचारण्यात आल्याचे समजले. वाझेकडील या माहितीची पडताळणी परमबीर सिंग यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: "सत्ता टिकवण्यासाठी हिंदुत्व तर सोडलंच आहे, पण किमान..."

या प्रकरणी नुकतीच ईडीने न्यायालयाकडे वाझेची चौकशी करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने त्याला परवानगी दिली आहे. ईडीचे अधिकारी तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझे याची चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही तळोजा कारागृहात 19 मे व 21 मेला वाझेचे स्टेटमेंट ईडीने रेकॉर्ड केले होते. त्यात त्याने अनेक खळबळजन दावे केले होते. त्या दाव्यांच्या आधारावरच ईडीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदेने व खासगी सचिव संजीव पालांडे यांना अटक केली होती. आता याप्रकरणी परमबीर सिंग यांनाही ईडीने समन्स पाठवले असून त्यांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे.

(संपादन- विराज भागवत)

loading image