esakal | Sachin Waze: 'ती' संशयित डायरी उलगडणार `अर्थ`पूर्ण व्यवहार?
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Waze: 'ती' संशयित डायरी उलगडणार `अर्थ`पूर्ण व्यवहार?

राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) हाती लागलेली संशयित डायरी या आर्थिक व्यवहार उघड करण्याची शक्यता आहे. डायरीतील नोंदी महत्त्वूपूर्ण ठरणार आहेत.

Sachin Waze: 'ती' संशयित डायरी उलगडणार `अर्थ`पूर्ण व्यवहार?

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणात पोलिस दलातील भ्रष्टाचाराची बाबही चर्चेत आली, असताना आता राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) हाती लागलेली संशयित डायरी या आर्थिक व्यवहार उघड करण्याची शक्यता आहे. सीआययूच्या कार्यालयात शोधमोहिम राबवताना हाती लागलेली या डायरीतून अर्थपूर्ण माहिती एनआयएच्या हाती लागली आहे.सचिन वाझे यांच्या सीआययू कार्यालयात एनआयएने शोध मोहिम राबवली होती.  वाझे यांचा मोबाईलसह कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त केले होते. यावेळी एनआयएच्या हाती लागलेली डायरी महत्त्वपूर्ण ठरत आहे. पहिल्यांदा कार चोरी, मग स्फोटके आणि त्यानंतर हत्येवरून हे प्रकरण आता पोलिस दलातील भ्रष्टाचार यापर्यंत पोहोचले आहे. त्यादृष्टीने डायरीतील नोंदी महत्त्वूपूर्ण ठरणार आहेत.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या डायरीत नोव्हेंबरपासूनच्या अर्थपूर्ण नोंदी आहेत. याच काळात शहरातील अनेक हुक्का पार्लर, पब आणि बारवर छापे टाकण्यात आले होते. त्यामुळे पाच आलिशान गाड्या, ५ लाखांची रोख, पैसे मोजण्याचे मशीन आणि संशयित डायरी ईडीच्या रडारवर आहे. मोबाइलमधून महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आल्याचंही समजतंय. त्यामुळे पोलिस दलातील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सचिन वाझे यांच्या मर्सिडिज कारमध्ये सापडलेले पाच लाख रुपये, पैसे मोजण्याची मशीन आणि एनआयएला सापडलेली ही डायरी. त्यामुळे याप्रकरणात ईडीची एंट्री होणार आहे. या डायरीच्या सहाय्याने नोंदींची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय सचिन वाझे संचालक पदी असलेल्या कंपन्यांचा खुलासा याआधीच भाजपकडून करण्यात आला होता. त्यातच सचिन वाझे यांच्या पैशांचा स्त्रोताचा पाठपुरावा ईडी करण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेल्या वाझेंचा महिन्याचा पगार सरासरी 60  हजार असताना त्यांचे इतर पैशांच्या स्त्रोतांबाबतही ईडी तपास करेल. त्यात मनी लाँडरींग झाले आहे का, याची पडताळणी ईडी मार्फत करण्यात येईल.

--------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Sachin waze Suspected diary in hands NIA reveal financial transactions

loading image