सचिन वाझेच्या वसुली रॅकेटची सेटिंग, १२ लाखात बुक केली होती रुम

sachin-waze 2.jpg
sachin-waze 2.jpg

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्कॉर्पियो कार स्फोटक प्रकरण आणि मनुसख हिरेन हत्या प्रकरणात NIA च्या अटकेत असलेल्या API सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सचिन वाझे कथित वसुली रॅकेट नरिमन पॉईंटच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधुन चालवत असल्याचे राष्ट्रीत तपास यंत्रणेच्या चौकशीतून समोर आले आहे. नरिमन पॉईंट जवळच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका बिझनेसमॅनने १२ लाख रुपये भरुन त्याच्यासाठी १०० दिवसांसाठी रुम बुक केली होती. बनावट आयकार्डवर सचिन वाझेने रुम बुक केला होता. 

स्कॉर्पियो स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए वाझेच्या भूमिकेची चौकशी करत आहे. रोज या प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. निलंबित केलेल्या वाझेशिवाय आणखी काही पोलिसांचीही NIA ने चौकशी केली आहे. आणखी काही जणांना या प्रकरणात अटक होऊ शकते, असे एनआयएकडून सांगण्यात आले. सुशांत सदाशिव खामकर हे बनावट आधार कार्डावरील नाव धारण करुन, तो हॉटेलमध्ये राहत होता. हिंदुस्थान वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. 

"एका उद्योगपतीने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये खास वाझेसाठी १०० दिवसांसाठी १२ लाख रुपयांमध्ये रुम बुक केली होती. वाझे या उद्योगपतीची वादाच्या एका प्रकरणात मदत करत होता. वाझे फेब्रुवारी महिन्यात इथे राहत होता" असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सचिन वाझे १६ फेब्रुवारीला इनोव्हा कारमधून इथे आला आणि २० फेब्रुवारीला एका लँड क्रूझर गाडीमधून इथून निघून गेला. दोन्ही गाड्या NIA ने ताब्यात घेतल्या आहेत. 

NIA ने सचिन वाझेला १३ मार्चला अटक केली. एनआयएने दक्षिण मुंबईतील एक हॉटेल, क्लब आणि ठाण्याच्या जवळ फ्लॅटमध्ये छापा मारला. वाझेसोबत एक महिलादेखील असल्याची माहिती होती. त्या महिलेची NIAने गुरूवारी कसून चौकशी केली. NIAचे पथक या महिलेचा तपास करत होते. अखेर गुरुवारी NIAने त्या महिलेच्या घरी धडक मारली. NIAच्या पथकाने त्या महिलेचे नाव किंवा ओळख अद्याप उघड केलेली नाही. मात्र त्या महिलेच्या घराची काल झाडाझाडती घेण्यात आली. तसंच तिची दीर्घ काळ कसून चौकशी करण्यात आली, असं NIAच्या अधिकाऱ्याने सांगितले. सचिन वाझेसोबत असलेल्या या महिलेकडे वाझेचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम होते. ती दोन वेगळ्या ओळखपत्रांसह हे काम करायची. वाझेकडे असणाऱ्या काळ्या मर्सिडीजमधील नोटा मोजण्याच्या मशिनचा वापर ही महिला करत अशा माहिती NIAच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com