Shivsena: शिवसैनिक-सरवणकरांमध्ये पुन्हा वाद; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

sada sarvankar
sada sarvankarSakal

मुंबई : गुरूवारी रात्री ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धारावीत पुन्हा वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात असून पोलिसांनी ठाकरे गटाच्या तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. काल धारावीमध्ये सदा सरवणकरांची सभा संपल्यानंतर ठाकरे गटाच्या ३५ ते ४० जणांणी शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी येथे शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये झालेला वाद जुना नसताना काल धारावीत सदा सरवणकरांच्या बैठकीदरम्यान पुन्हा वाद झाला आहे. तसेच मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना आणि शिंदे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा वाद झाला असून तीन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sada sarvankar
ISI एजंटची पळून पळून केली हत्या; वाचवण्यासाठी मुलीची छतावरून उडी

दरम्यान, सदा सरवणकरांची बैठक संपल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि शिवीगाळ केल्याचा दावा सरवणकरांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे शिवसैनिकांना शांत केले गेले असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com