
एनडीएचे घटक पक्ष असलेले रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली.
मुंबई - एनडीएचे घटक पक्ष असलेले रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. खोत यांनी राज्यपाल नियुक्त 12 विधीमंडळ सदस्यांची नावे राज्यपालांना दिली आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकारने राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी 12 उमेदवारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यपालांना कितीवेळात त्यावर निर्णय घ्यावा याचे बंधन नाही. आता रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनीच राज्यपालांना 12 नावे सुचवली आहेत. ही नावे कला, क्रीडा, सामाजिक, साहित्य इत्यादी क्षेत्रातील आहेत. यामध्ये मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांची नावे असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - गरिब रुग्णांना मोफत उपचार द्या! धर्मादाय रुग्णालयांना ग्रामविकास मंत्र्यांचे निर्देश
एकीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नावांवर राज्यपालांनी निर्णय घेतला नसून दूसरीकडे एनडीएचा घटकपक्ष असलेल्या रयत क्रांतीने राज्यपालांना नावे सूचवल्याने सत्ताधाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.