
6 वर्षाच्या ग्रीहिताने झिप्लायनिंग करत केला नवरा नवरी सुळखा पार
डोंबिवली : सह्याद्री पर्वत रांगांतील नवरा नवरी सुळख्यांचे गिर्यारोहकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. गिर्यारोहण क्षेत्रात चिमुरडे गिर्यारोहक देखील आपली चमक दाखवित असून सहा वर्षीय ग्रीहिता विचारे हिने त्र्यंबकेश्वर जवळील नवरा नवरी सुळका झिप्लायनिंग करत पार केला आहे. कल्याणच्या सह्याद्री रॉक एॅडव्हेंचर या साहसी गिर्यारोहक संस्थेच्या मदतीने ही कामगिरी केली आहे. तिने दाखविलेल्या या धाडसामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सह्याद्री पर्वत रांगांमधील उंचच उंच सुळखे नेहमीच गिर्यारोहकांना साद घालत असतात. यात प्रमुख आकर्षण म्हणजे नवरा नवरी सुळख्यांचे. नवरा नवरी सुळखे म्हणजे एकाच डोंगरावर आजूबाजूला उभे असलेले सुळखे.असेच नवरा नवरी सुळखे नाशिक त्र्यंबकेश्वर गावाजवळ लक्ष्मणपाडा ह्या छोट्या वाडीच्या बाजूला पाहायला मिळतात.
नवरी सूळख्याची उंची सुमारे 280 फूट उंच असून नवरा सूळख्याची उंची ही सुमारे 260 आहे. सोबतच ह्या नवरा-नवरी सुळख्याच्या आजूबाजूला श्री हनुमान यांचे जन्मस्थान असलेले अंजनेरी पर्वत, भांडरदुर्ग, भास्करगड, हरिहर असे उंच पर्वत पाहायला मिळतात. कल्याणच्या सह्याद्री रॉक एॅडव्हेंचर या गिर्यारोहण संस्थेच्या गिर्यारोहकांच्या साथीने केवळ 6 वर्षीय चिमुरडी ग्रीहिता विचारे या चिमुरडीने नववारी सानवरी सूळख्याची उंची सुमारे 280 फूट उंच असून नवरा सूळख्याची उंची ही सुमारे 260 आहे. सोबतच ह्या नवरा-नवरी सुळख्याच्या आजूबाजूला श्री हनुमान यांचे जन्मस्थान असलेले अंजनेरी पर्वत, भांडरदुर्ग, भास्करगड, हरिहर असे उंच पर्वत पाहायला मिळतात. कल्याणच्या सह्याद्री रॉक एॅडव्हेंचर या गिर्यारोहण संस्थेच्या गिर्यारोहकांच्या साथीने केवळ 6 वर्षीय चिमुरडी ग्रीहिता विचारे या चिमुरडीने नववारी साडी नेसत सुमारे 2 हजार फूट उंचीवरुन दोन सूळक्यावरुन झिप्लायनिंग द्वारे यशस्वी रित्या ही मोहीम फत्ते केली आहे. सकाळी 6 वाजता लक्ष्मणपाडा येथून सुळक्याच्या माथ्यावर चढायला सुरुवात केली. सुमारे 1 तासाचा ट्रेक केल्यानंतर तीने सुळक्यांचा पाया गाठला.
Web Title: Sahyadri Rock Adventure Of Kalyan Mountain Range Ziplining
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..