आर्थिक राजधानी मुंबईसाठी वेगळं पॅकेज जाहीर करा...शिवसेना खासदार संजय राऊत यांची केंद्र सरकारकडे मागणी.... 

sanjay raut
sanjay raut

मुंबई : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. तब्बल ३ वेळा लॉकडाऊन वाढवूनही देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याचं  नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या कठीण काळात संजय राऊत यांनी मुंबईसाठी वेगळ्या आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. 

लॉकडाऊनमुळे कंपन्या आणि व्यवसाय बंद आहेत तसंच कित्येक लोकांची नोकरीही गेली आहे. त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. काही लोकांवर उपासमारीची वेळ आहे. याच कठीण परिस्थतीतून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे.

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसंच मुंबईसाठी वेगळं पॅकेज देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. देशाला इतक्या मोठ्या पॅकेजची गरज होती", असं संजय राऊत यांनी म्हंटलंय.

आर्थिक राजधानीचं महत्व टिकवणं आवश्यक:

“देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्व टिकवणं महत्त्वाचं आहे. मुंबईचं आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे केंद्र सरकारनं वेगळं आर्थिक पॅकेज मुंबईला दिलं पाहिजे. तसंच फक्त मुंबईच नाही तर मुंबईसारख्या शहरांसाठी वेगळं  आर्थिक पॅकेज देणं गरजेचं आहे", असं संजय राऊत यांनी म्हंटलंय. 

सध्या टीका करणं योग्य नाही:

“नरेंद्र मोदी देशातल्या शेतकरी, मजूर, लघू-मध्यम उद्योगांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाचं मोठं संकट असल्यामुळे सध्या कोणावरही टीका करणं योग्य नाहीये. तसंच संपूर्ण देशानं पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे,” असंही संजय राऊत यांनी सांगितलंय.

त्यामुळे आता संजय राऊत यांची मागणी मान्य करून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईसाठी केंद्र सरकार वेगळं पॅकेज जाहीर करतं का हेच बघणं महत्वाचं असणार आहे. 

sajay raut asked for declear diffreent package for mumbai read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com