esakal | सकाळ ॲग्रोवनच्या ‘सुगरण’ स्पर्धेचा मुंबईच्या महापौरांनी केला शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor kishori pednekar

सकाळ ॲग्रोवनच्या ‘सुगरण’ स्पर्धेचा मुंबईच्या महापौरांनी केला शुभारंभ

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : सकाळ आणि ॲग्रोवनच्यावतीने (Sakal Agrowon) होत असलेल्या ‘सुगरण’ स्पर्धेचा (sugran competition) शुभारंभ (inauguration) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्या हस्ते केक कापून झाला. महापौरांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. खास महिलांच्या स्पर्धेच्या निमीत्ताने कोविड, उन्हाळा, पावसाळ्याचे आव्हान पेलत खंड न पाडता वाचकांपर्यंत वर्तमानपत्र पोहचविणाऱ्या महिला विक्रेत्यांचाही (women's greetings) महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

हेही वाचा: उल्हासनगर महापालिकेसमोर कचऱ्याच्या गाड्या उभ्या करुन कामगारांचे आंदोलन

सकाळ आणि ॲग्रोवनच्या वतीने महिलांना एक कोटीहून अधिक रकमेची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली आहे. मुंबईच्या प्रथम नागरिक त्यात महिला म्हणून खास महापौर पेडणेकर यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. भायखळा येथील महापौर निवासस्थानी कोविडच्या नियमावलीचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला. महापौरांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छाही दिल्या.

फक्त महिलांसाठी असलेल्या या कार्यक्रमांच्या शुभारंभा प्रसंगी वृत्तपत्र विक्रेत्या सुनीता चौगुले ( दादर) , दिशा बागवे (दादर),सुवर्णा महाडिक (दादर),सीमा कदम (भायखळा), मंगल वाणी (कुर्ला), यांच्या सोबत नवी मुंबईतील कोपर खैराणे यांनी प्रभाग क्रमांक 44 च्या नगरसेविका दमयंती बबनशेठ आचरे ही उपस्थीत होत्या.आचरे या शिवसेना महिला आघाडीच्या उप जिल्हासंघटक तर आहेतच त्याच बरोबर सहकार क्षेत्रात दबदबा असलेल्या सातारा सहकारी बॅकेच्या संचालिकाही आहेत.या सर्वांचा महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.महापौर निवासस्थान महापौरांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.तशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

जिंका एक कोटीहून अधिक रकमेची बक्षिसे

सकाळ आणि ॲग्रोवनच्या वतीने महिलांसाठी 'सुगरण ' स्पर्धा 10 सप्टेंबर 2021 ते 11 डिसेंबर 2021 सुरू होत आहे. यानुसार 90 दिवसांच्या कालावधीत ‘सकाळ’च्या अंकात सुगरण नावाचे महिलांसाठी खास सदर प्रसिद्ध होईल. सदरामध्ये रेसिपीवर आधारित खास सदरांचा समावेश आहे. यातील मजकूरावर आधारित प्रश्नाचे कुपन देण्यात येणार आहे. सदराला जोडूनच महिलांसाठी ‘आकर्षक बक्षिस योजना' असेल.वृत्तपत्र विक्रेत्यांनी जास्तीत जास्त वाचकांपर्यंत या स्पर्धेची माहिती पोहोचवून आपल्या व्यवसायात व उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन सकाळ समूहाच्या वतीने करण्यात आले.

loading image
go to top