esakal | Sakinaka Case: नक्की काय घडलं याबाबत अनभिज्ञ आहोत- मुंबई पोलिस आयुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Sakinaka Case: नक्की काय घडलं याबाबत अनभिज्ञ आहोत- मुंबई पोलिस आयुक्त

Sakinaka Case: नक्की काय घडलं याबाबत अनभिज्ञ आहोत- मुंबई पोलिस आयुक्त

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: मुंबईतील साकीनाका या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. साकीनाकामधील खैरानी रोड या परिसरात बलात्कार झालेल्या 30 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणासंददर्भात आता मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत या घटनेसंदर्भातील तपासाबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी म्हटलंय की, नऊ आणि दहा तारखेच्या रात्री तीन वाजेच्या सुमारास साकिनाका परिसरात ही घटना घडली आहे. वॉचमनने पोलिसांना कळवलं की एका बाईला मारहाण सुरु आहे. त्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं. त्यांना एका उघड्या टेम्पोच्या आत महिला अत्यंत सिरीयस कंडीशनमध्ये आढळली. परिस्थिती पाहता पोलिसांनी टेम्पोची चावी घेऊन गाडी चालवत ताबोडतोब राजवाडी हॉस्पिटलला दाखल केलं. डॉक्टरांनी महिलेवर उपचार सुरु केले. वॉचमनच्या तक्रारीवरुन साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

ते पुढे म्हणाले की, या तपासामध्ये पोलिस अधिकारी क्राईम ब्रँचचे अधिकारी कामाला लागले. परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यात आले. त्यावरुन मोहन नावाच्या आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतलं. या आरोपीचे कपडे जप्त करण्यात आले. रक्ताचे डाग आढळले. 21 सप्टेंबरपर्यंत त्याची पोलिस कोठडी घेतली आहे. एसीपी ज्योत्स्ना रासन अधिकाऱ्यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक, त्यांच्या हाताखाली स्पेशल तपास टीम नियुक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवू. महिलेचा उपचार सुरु असताना ती दगावली. या गुन्ह्याला 302 चे कलम देखील लावले आहे. संभ्रम होता की जास्त आरोपी आहेत . कलम 34 लावलं होतं. मात्र, फक्त एकच आरोपी या तपासात निष्पन्न झालं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे त्यांनी म्हटलंय की, पीडित स्त्रीचा जबाब रेकॉर्ड करता आलेला नाहीये. ती बेशुद्धावस्थेत होती. त्यामुळे काय घडलंय याबाबत सध्या आम्ही अनभिज्ञ आहोत. मात्र तपासात गोष्टी स्पष्ट होईल. तपास पूर्ण होऊन चार्ज शीट दाखल होईल.

loading image
go to top