esakal | साकीनाका बलात्कार : पीडितेच्या मुलींची जबाबदारी घ्यावी - आयोग
sakal

बोलून बातमी शोधा

 बलात्कार

साकीनाका बलात्कार : पीडितेच्या मुलींची जबाबदारी घ्यावी - आयोग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : साकीनाका येथे बलात्कार व अत्याचारानंतर मृत्यु झालेल्या महिलेच्या मुलींच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी तसेच त्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून आणि सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जावे, अशी सूचना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी राज्य सरकारला केली आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने चर्चेसाठी बोलावले. या घटनेकडे राज्य शासन गांभीर्याने पाहात असून पीडीतेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देवून तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल, असे आयोगास सांगितले.

पोलिसांच्या तपासावर समाधान

राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये, असे देखील स्पष्ट केले. तसेच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले.

loading image
go to top