मुंबईकरांसाठी लॉकडाऊनमध्येही घरपोच फळे, भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

नाशिकच्या "सह्याद्री फार्म्स'चे लॉकडाऊन काळात नागरिकांसाठी नियोजन 

मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटामुळे शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडले आहेत. या वेळी शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मदतीसाठी नाशिक येथील "सह्याद्री फार्म्स' कंपनी पुढे सरसावली आहे.

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

कंपनीच्या मुंबई, नाशिक येथील रिटेल साखळीच्या माध्यमातून भाजीपाला, फळे व इतर उत्पादने विकली जातात. कोरोनाच्या संकटात फार्म्सने मुंबई, नाशिकसोबतच पुण्यातील प्रत्येक घरापर्यंत फळे आणि भाजीपाला पोहचवण्याचे ठरवले आहे. या तीन शहरांमध्ये ताजा, स्वच्छ आणि आरोग्यदायी भाजीपाला-फळे पुरवण्यासाठी "फार्म्सचे' हजारो शेतकरी आणि वितरण प्रक्रियेतील शेकडो जण स्वयंप्रेरणेने पुढे सरसावले आहेत. या उपक्रमासाठी आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले सर्व निकषांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. तसेच त्याकरिता लागणाऱ्या आवश्‍यक शासकीय परवानग्या कंपनीने घेतल्या आहेत. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या तीन शहरांमध्ये भाजीपाल्यासाठी किंवा फळांसाठी नागरिकांना घराबाहेर पडून गर्दीत जाऊन जीव धोक्‍यात घालण्याची गरज नाही. रहिवासी इमारत, सोसायटी, कॉलनी किंवा टाऊनशिपमधील रहिवासी मिळून आठवड्याची एकत्रित बास्केट ऑर्डर सह्याद्रीच्या शहरांमधील प्रतिनिधींकडे नोदवायची आहे. किमान 50 बॉक्‍सची ऑर्डर असणे आवश्‍यक आहे. ही ऑर्डर सोसायटी किवा टाऊनशिपने ठरवलेल्या ठिकाणी पोहोचवण्यात येईल. अधिक माहितीसाठी कंपनीच्या www.sahyadrifarms.com संकेतस्थळाला भेट देता येईल. 

सध्या भारतातून कृषिमालाची निर्यात थांबली आहे. शिवाय देशांतर्गत बाजारपेठेतही अडचणींमुळे भाजीपाला, फळे पोहोचू शकत नाहीत. यासाठी नागरिकांपर्यंत फळे, भाजीपाला पोहचवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. 
- विलास शिंदे, अध्यक्ष सह्याद्री फार्म्स

Sale of homemade vegetables, fruits for Mumbai sahyadri farms


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of homemade vegetables, fruits for Mumbai sahyadri farms