आदित्य ठाकरेंना आता सलमानच्या 'शेरा'चे बळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

सलमान खान याचा प्रसिद्ध बॉडिगार्ड आणि सुरक्षा संस्थेचा प्रमुख शेरा याने काल मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना आता प्रचारात बॉलिवूड अभिनेत सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा मदत करताना दिसत आहे. शेराने काल शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सलमान खान याचा प्रसिद्ध बॉडिगार्ड आणि सुरक्षा संस्थेचा प्रमुख शेरा याने काल मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी त्याने शिवसनेच्या प्रचारात देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या प्रचार फेरीत सलमान खान यांचे बॉडीगार्ड शेरा याने हजेरी लावली. शेराने कालच सेनेत प्रवेश केला असून आपण आदित्य यांच्यापासून प्रभावित असून, भविष्यात जी जबाबदारी मिळेल ती पेलणार असल्याचे शेरा याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salman Khan bodyguard Shera enters Shivsena