संभाजीराजे उपोषण : आझाद मैदानात दिवसभरात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या

मी सर्व समाजाचे अभार व्यक्त करतो-संभाजीराजे
sambhaji raje
sambhaji rajeesakal

कोल्हापूर : मराठा समाजाच्या पाच मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. कल्याण (पुर्व)येथील प्रथमेश भास्कर पुंडे या तरुण कार्यकर्त्यांने रक्ताने लिहलेले पत्र पाहून संभाजीराजे भावूक झाले. आपल्या रक्ताचा, व घामाचा उपयोग समाजहित व राष्ट्रहितासाठी व्हावा! भावनेच्या भरात असे कोणतेही कृत्य कोणीही करु नये असे भावनिक आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

सरकारने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे पर्याय उरला नाही. म्हणून मराठा समाजाच्या पाच मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलो आहोत. माझे आंदोलकांना एकच सांगणं आहे की, आंदोलन शांततेत पार पाडावं. असे संभाजीराजे यांनी आंदोलन सुरु होण्यापूर्वी पत्रकार परीषदेत सांगितले आहे. या सोबतच त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांविषयी आठवण करून दिली. दरम्यान मुंबईतील डब्बेवाल्यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला आहे.

आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे आंदोलन स्थळी दाखल झाले असून, त्यांनी संभाजीराजेंची भेट घेतली आहे.

मुंबई: आझाद मैदान येथील खासदार संभाजी राजे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आमरण उपोषणाला मुंबईतील डब्बेवाल्यांनी पाठींबा दिला आहे.

मराठी आरक्षणविषयी राज्यसरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबईत बोलताना ही घोषणा केली होती. 2007 पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजही वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं.मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं होतं. यानंतर त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

आपण मराठ्यांची बाजू भक्कम घेता

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्वप्न पाहिले

ते फक्त मराठ्यांना घेऊन नाही तर १८ पगड जाती ना घेऊन केलं.

नंतर शाहू महाराजांनी बहुजन समजाला आरक्षण दिले.

ह्यात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसीसह ह्यात मराठा ही होते.

मी मराठा म्हणून नाही तर बहुजन समाजाला एकाच छता खाली कस आणता येईल ते पाहणार आहे.

गरीब मराठ्यांशी लढा आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही म्हणून मी महाराष्ट्र पिंजून काढला. २००७पासून महाराष्ट्रात फिरत आहे.

मी मराठा म्हणून नाही तर बहुजन समाज या सगळ्यांना एक छता खाली कस आणता येईल ते पाहणार आहे.

EBC आरक्षण मिळाले पण टिकले नाही.

राज्याची जबाबदारी होती review petition दखल करणे.

आरक्षण दीर्घ कालीन प्रक्रिया आहे. त्यातही मागण्या आहेत. मग पुन्हा आंदोलन झाले

१६ जूनला मुक आंदोलन झाले.

१७ जून सरकारने बोलवले.

तेव्हा १५ दिवसात मागण्या पूर्ण करू असे सरकारने सांगितले.

आम्ही सांगितले दोन महिने घ्या, पण काही झालं नाही.

अण्णासाहेब पाटील महामंडळाने, सरकारने चारशे कोटी जाहीर केले त्यापैकी ५० कोटी दिले.

३० कोटी आले परंतु परतावा करायला पैसे नाही अशी स्थिती आहे.

कार्यकारी संचालक नाही, संचालक बॉडी नाही.

१०लाख रुपयांच्या कर्ज व्याज परताव्याची मर्यादा वाढवून २५ लाख करा.

सारथी संस्था निधी द्यावा मागणी

पुण्यात, कोल्हापुरात आंदोलन सुरू झाले आहे.

आठ महिने झाले कोर्स नाही, स्टाफ नाही

जागा हस्तांतरीत झाली नाही

मी लढा उभा करायचा नाही का?

संभाजीराजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, अशा घोषणा देत सकल मराठा समाजातर्फे कोल्हापुरात दसरा चौकात आजपासून साखळी उपोषणास सुरुवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com