esakal | NCB बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करतेय का? समीर वानखेडेंचं सडेतोड उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

Drugs: NCB बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करतेय का? समीर वानखेडेंचं सडेतोड उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Drugs Case: ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यनला Aryan Khan एनसीबीने अटक केली. या अटकेनंतर एनसीबी बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करत असल्याची टीका काही जणांकडून होत आहे. या टीकाकारांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर, महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्यांना पकडण्यात आम्हाला यश मिळालं आहे. अशा लोकांना आम्ही अटक करू नये का," असा सवाल त्यांनी केला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रकरणांविषयी भाष्य केलं.

"आम्ही शांत बसू शकत नाही"

आर्यन खानच्या अटकेविषयी ते म्हणाले, "केस नंबर १६ नंतर (सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरण) आम्ही रविवारी १०५ व्या प्रकरणाची नोंद केली आहे. नियमांच्या उल्लंघनाच्या प्रमाणाची तीव्रता तुम्हाला जाणवतेय का? ड्रग्जशी संबंधित इतर प्रकरणांविषयी का बोललं जात नाही? कारण ग्लॅमर नसलेल्या गुन्ह्यांविषयी बोलण्यात कोणालाच रस नाही. पण एनसीबी शांत बसू शकत नाही. आम्ही न थांबता गुन्हे लोकांसमोर आणतोय. मोठमोठ्या गुन्हेगारांना आम्ही पकडत आहोत. आम्ही प्रमुख ड्रग्ज नेटवर्क चालवणाऱ्या १२ टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. त्या मोहिमांबद्दल कोणीच का बोलत नाही?"

हेही वाचा: प्रसिद्धी नियमांचं उल्लंघन करण्याचा अधिकार देते का? - समीर वानखेडे

प्रसिद्ध आहेत म्हणून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आम्ही अटक करू नये का?

"फक्त सेलिब्रिटी केसेस दाखवण्यात मीडियाला रस आहे. कारण ती प्रसिद्ध लोकं आहेत आणि प्रत्येकजणांना त्यांच्याविषयी बोलायला आवडतं. असे गुन्हे जेव्हा समोर येतात, तेव्हा लोकांना वाटतं की आम्ही फक्त सेलिब्रिटींना लक्ष्य करतोय. पण मी त्यावरही सवाल उपस्थित करेन. केस नंबर १६ नंतर आम्ही ९० केसेस समोर आणले आहेत आणि त्यात फक्त एकच सेलिब्रिटी आहे, हे तुम्हालासुद्धा माहित आहे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर, महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्यांना पकडण्यात आम्हाला यश मिळालं आहे. अशा लोकांना आम्ही अटक करू नये का? का करू नये? कारण ते प्रसिद्ध आणि मोठे व्यक्ती आहेत म्हणून? अशा पद्धतीने काम होत नाही", असं ते पुढे म्हणाले.

loading image
go to top