संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 November 2019

संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात अँजियोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 ब्लॉक असल्याचं निदान झालं.

संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात अँजियोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 ब्लॉक असल्याचं निदान झालं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. “काही दिवसांपूर्वी त्यांच्या काही चाचण्या झाल्या होत्या. तपासण्यांमधून त्यांच्या प्रकृतीत काही बदल झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. अजित मेेनन यांच्या देखरेखीत त्यांना ठेवलं जाणार आहे. 

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर असलेली जबाबदारी शिवसेनेचे नेते सुनील परब, मिलींद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत संजय राऊत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. जवळपास रोज दोन-तीन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सत्ताधारी भाजपला घाम फोडला होता. शिवसेनेची भूमिका मांडण्याचे जबाबदारी पूर्णपणे संजय राऊत यांच्यावर होती. गेल्या पंधरा दिवसांत दगदग झाल्यामुळे राऊत यांची प्रकृती बिघडली आहे.

Webtitle : sanjay raut detected with two blocks in heats 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut detected with two blocks in heats