
मी कपड्यांची बॅग भरून आलोय, संजय राऊतांनी ED लाच सुनावलं?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तब्बल नऊ तासापासून ईडीकडून चौकशी सुरू होती. महाराष्ट्रातील राजकीय ड्रामा सुरू असतानाच राऊत यांना ईडीचं दुसरं समन्स आलं होतं. त्यांचा अलिबाग दौरा असल्याने चौकशीच्या समन्सला प्रत्युत्तर दिलं होतं. अखेर राज्यात नवं सरकार आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राऊत यांनी सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात हजेरी लावली. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. (Sanjay Raut Latest News)
मी कपड्याची बॅग भरून आल्याचं राऊतांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. ही जमीन कुठे आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, असं ते म्हणाले. तब्बल ९ तासांपेक्षा जास्त वेळच्या चौकशीनंतर राऊत ईडी कार्यालयातून बाहेर आले. (Sanjay Raut ED Investigation)
तुम्ही तुमचं काम करा, मी सहकार्य करतो,असे राऊत म्हणाले.
हेही वाचा: Sanjay Raut | 9 तासांनंतर संजय राऊत ED कार्यालयाबाहेर
प्राण जाए पर वचन ना जाए
स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करयाच्या आणि असं वागायचं. आम्हाला बाळासाहेबांनी प्राण जाए पर वचन ना जाए, असं बाळासाहेबांनी शिकवलं. ठाण्यातील बॅनरबाजी करून एकनाथ शिंदे यांनी गुमराह करण्याचा प्रयत्न केलाय. हा सेनेचा मुख्य़मंत्री नाही, हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितल्याचं राऊतांनी सांगितलं.
आपण आपल्या नेत्याला फसवलं. शिवसेनेला फसवलं. ही भाजपची स्ट्रॅटजी आहे, असा आरोप त्यांनी केला. पण या राज्यातील जनता दुदखुळी नाही. त्यामुळे यावर न बोलता नव्या सरकारने त्यांचं काम करावं, असं राऊत म्हणाले.
चर्चा होऊ शकते. आधीही झाली असती. पक्षाचा कार्यकर्ता कोणत्याही मोहाला दबावाला बळी पडत नाही. मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मी पडलो असतो तरीही शिवसेना सोडली नसती. मी बाळासाहेबांच्या विचारांचा माणूस आहे. जे बुडबुडे होते ते फुटले आता. मी फुटणारा बुडबुडा नाही, असं खासदार राऊत यांनी सांगितलंय
भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे.
त्यासाठी भाजपने तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे.
मुंबईवर बाळासाहेबांचा झेंडा आहे. शिवसेनेचा झेंडा आहे.
बघा काँग्रेस खुपदा फुटली.
Web Title: Sanjay Raut Ed Enquiry Latest News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..