
"ठाकरेंना दाखवायचंय की..."; राऊतांवरच्या ED कारवाईवर सेनेची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीचा तपास सुरू असल्याची माहिती हाती येत आहे. याच विषयी शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने चालली असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी दाखल; अटक होणार?
अरविंद सावंत यांनी राऊतांवरच्या कारवाईनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सावंत म्हणाले की, यापूर्वीही संजय राऊतांनी अनेकदा सांगितलंय की माझा संबंध नाही. ईडीने समन्स बजावल्यावरही सांगितलं की सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे, त्यानंतरची तारीख द्या. त्यामुळे सहकार्य केलं नाही वगैरे काही नाही. ही सूडबुद्धी आहे. त्यांनी अधिवेशनामुळे फक्त वेळ वाढवून मागितली होती.
हेही वाचा: सोनिया गांधी ईडी कार्यालयातून पडल्या बाहेर; तीन दिवसांत 11 तास चौकशी
सावंत पुढे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात सध्या जे चाललंय त्यावर राऊत सातत्याने आसूड ओढतात. त्यांच्याविषयीचा सूड कसा उगवायचा, म्हणून हे सगळं चाललंय. ते जेव्हा निवडणुकीला उभे राहिलेत, त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात सगळी संपत्ती दाखवली आहे. हे सगळं सूडबुद्धीने चाललंय. उद्धव ठाकरेंना हे दाखवून द्यायचंय की बघा तुमच्या जवळच्या माणसालाही आम्ही त्रास देऊ शकतो. शरण या नाहीतर ईडी आहेच.
Web Title: Sanjay Raut Ed Enquiry Shivsena Arvind Sawant First Reaction
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..