संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत, 'या' दिवशी होणार प्रसारित

पूजा विचारे
Tuesday, 21 July 2020

संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही विशेष मुलाखत घेतली आहे. फेसबुकवर एक पोस्ट करुन त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेने नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. आता संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही विशेष मुलाखत घेतली आहे. फेसबुकवर एक पोस्ट करुन त्यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. येत्या २७ जुलैला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं दरवर्षी संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत असतात. त्याप्रमाणे याही वर्षी ही मुलाखत प्रसारित होईल. यावेळी मात्र उद्धव ठाकरे एक मुख्यमंत्री म्हणून बोलतील, कारण आजपर्यत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुलाखत द्यायचे यावेळी मात्र शिवसेना पक्षप्रमुखसोबतचं ते राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. याच पार्श्वभूमीवर देश आणि राज्य स्तरावरचे विविध प्रश्नं आणि सध्या कोरोनाचं संकट यावर ही मुलाखत असेल. 

येत्या 25 आणि 26  जुलैला अशा दोन भागात ही मुलाखत सामना डिजीटलच्या माध्यातून प्रसिद्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी संजय राऊत यांनी फेसबुक पोस्टही शेअर केलीय.  यात उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल असा उल्लेख राऊतांनी केला आहे. 

 

संजय राऊतांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली... उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले.. मुलाखत 25 आणि 26 जुलै रोजी वाचता पाहता येईल.

गेल्या आठवड्यामध्ये संजय राऊतांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शरद पवारांनी बऱ्याच प्रश्नांची चोख उत्तरं दिली होती. एकच शरद सगळे गारद असं या मुलाखतीचं मुख्य शीर्षक होतं. ही मुलाखत ३ भागांमध्ये प्रसारित केली होती. या मुलाखतीत कोरोना महामारी, महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग, चीनचा प्रश्न, केंद्र सरकार या आणि अशा अनेक विषयांवर त्यांनी मुलाखतीत चर्चा केली होती.

Sanjay Raut interviews Chief Minister Uddhav Thackeray Will published on July 27


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut interviews Chief Minister Uddhav thackeray Will published on July 27