सर्वात मोठी बातमी! राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता; संजय राऊतांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

तुषार सोनवणे
Saturday, 26 September 2020

महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये अधून मधून धूसफूस पाहायला मिळत होती. तरीही राज्यातील सरकार उत्तम रितीने आणि तिन्ही पक्ष योग्य समन्वयाने काम करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत भाजपचे जेष्ट नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे.

राज्यात महाविकास आघा़डी सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने, सरकार तणावात आहे. अशातच महाविकास आघाडीत अनेकवेळा धूसफूस स्पष्टपणे जाणवली आहे. आज खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात दीड दोन तास महत्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका पंचतारांकीत ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे. याबैठकीचे नियोजन काही दिवसांपूर्वी स्वतः.च राऊत यांनीच केले होते. या बैठकीत नक्की काय चर्चा झाली. याबाबत प्राथमिक माहिती मिळू शकलेली नाही. 

परंतु, फडणवीस आणि राऊत यांची भेट राजकीय दृष्ट्या अनेक महत्वाची ठरत आहे. राजकाराणात कधीही काहीही घडू शकतं असं म्हटलं जातं, त्याची ही प्रचिती असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमधील कटूता टोकाला गेली आहे. ती कटूता कमी करण्याच्या दृष्टीने ही भेट असावी अशीही शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. सत्ता स्थापने आधी आणि नंतरही राऊत आणि भाजपचे संबध जबरजस्त ताणले गेले आहेत. दोघां पक्षाकंडून एकमेकांवर टोकाचे आरोप प्रत्यारोप करून झाले आहेत. परंतु महाविकास आघाडीत सगळे काही अलबेल नसेल. तर राऊत आणि फडवीस यांच्यातील ही भेट राज्यातील मोठ्या राजकीय बदलांची नांदीही असू शकते अशी शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.

संजय राऊत यांनी शुक्रवारी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी, 

 किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए... अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है... असे म्हटले होते. या ट्विटच्या माध्यामातून राऊत काही सांगू इच्छितात का यावरही चर्चा होत आहेत.

किसी भी रिश्ते को कितनी भी
ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए...
अगर
नज़रों में इज़्ज़त और बोलने में
लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है...

— Sanjay Raut (@rautsanjay61) September 25, 2020

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut met devendra fadanavis lunch diplomacy between shivsena bjp