Sanjay Raut: वेदांता-फॉक्सकॉन निसटला अन् राऊतांच्या शेवटच्या विधानाची चर्चा सुरू झाली!

नेटकऱ्यांना आता संजय राऊतांची फारच आठवण येत असल्याचं दिसून येत आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Sakal

महाराष्ट्रात येऊ पाहणारा आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आत्ताचं सरकार मागच्या सरकारला जबाबदार धरतंय, मागच्या सरकारने आत्ताच्या सरकारवर ताशेरे ओढले आहे. पण या सगळ्यात आता जेलमध्ये असलेल्या संजय राऊतांची चर्चा सुरू आहे.

Sanjay Raut
Video: अटक होण्यापूर्वी संजय राऊत 'हे' म्हणाले होते

गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊतांनी या वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र तरीही सध्या सोशल मीडियावर त्यांच्याच एका विधानाची चर्चा आहे. पोलिसांनी जेव्हा राऊतांना अटक केली आणि पोलीस त्यांना घेऊन जात होते. तेव्हा जाताजाता संजय राऊतांनी एक विधान केलं होतं की, "पेढे वाटा पेढे, महाराष्ट्र कमकुवत होतोय." याच विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Sanjay Raut
Tata-Airbus Project : वेदांता गुजरातला जाताच राज्य सरकारला खडबडून जाग; हालचालींना वेग

शिवसेनेच्या अनेक समर्थकांनी तसंच अनेक सोशल मीडिया युजर्सनी संजय राऊतांचा तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. काही जणांनी ट्वीट करत संजय राऊतांचं हे विधान शेअर केलं आहे. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनीही याविषयी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र तुम्हाला मिस करतोय. कारण आता महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहे. अशावेळी सकाळी संध्याकाळी तुमचा कडक आवाजातला होणारा विरोध खूप महत्त्वाचा आहे, असं ट्वीट कुचिक यांनी केलं आहे. तर महाराष्ट्र कमजोर होतोय हे संजय राऊतांचं विधान आता खरं ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com