यूपीत भाजपाच्या विजयासाठी मायावती, ओवैसींना भारतरत्न द्या : संजय राऊत

उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautTeam eSakal
Updated on

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या (BJP Wins In UP) विजयात योगदान दिल्याबद्दल बसपा प्रमुख मायावती (Mayawati) आणि ऑल इंडिया AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केले आहे. (Mayawati Owaisi Contributed To Bjp Win UP Says Sanjay Raut)

उत्तर प्रदेशात भाजपने मोठा विजय मिळवला असून, अखिलेश यादव (Akhilehs Yadav) यांच्या मागच्या वेळी 42 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवणुकीत 125 हून जागांवर विजय मिळाला आहे म्हणजेच यामध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. मात्र, युपीमध्ये मायावती आणि ओवैसी यांनी भाजपच्या विजयात हातभार लावला आहे, त्यामुळे त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न देण्यात यावे, असे राऊत यांनी एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना म्हटले आहे.

Sanjay Raut
Maharashtra Budget Session : अजित पवारांच्या अर्थसंकल्पात काय? वाचा एका क्लिकवर

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातील भाजपच्या विजयाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, “भाजपने 4 राज्यांमध्ये विजय मिळवला असून, यासाठी आम्हाला नाराज नसून, आम्हीदेखील तुमच्या आनंदात सहभागी असल्याचे म्हणत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसेच गोव्यात दोन उपमुख्यमंत्री पराभूत का झाले असादेखील प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करत पंजाबमध्ये भाजपला नागरिकांनी सपशेल नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut
मुंबईकरांसाठी मोठी बातमी; 'या' भागात ३० तास पाणी पुरवठा बंद

भाजपसारख्या पक्षाला पंजाबमध्ये (Punjab) पूर्णपणे नाकारण्यात आले आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, सर्वांनी जोरदार प्रचार केला, त्यानंतरही पंजाबमध्ये भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे का जावे लागले? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. यूपी, उत्तराखंड, गोवा याआधीच भाजपचे होते, पण, यूपीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या तुलनेत पंजाबमध्ये भाजपाचा मोठा पराभव झाला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com