
Sanjay Raut: ...तर आजही महाविकास आघाडीचं सरकार टिकलं असतं; संजय राऊतांनी व्यक्त केली खंत
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार आजही टिकलं असतं अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासाठी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरलं आहे. तसेच यामागं कट-कारस्थान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. (Sanjay Raut slams on BJP over Nana Patole resign from Speaker position)
राऊत म्हणाले, "विधानसभा अध्यक्षपद हे खूपच महत्वाचं पद असतं. या पदावरुन ज्या पद्धतीनं नाना पटोले यांनी राजीनामा दिला, हा एक प्रकारचा कटच होता. याचा डाव विरोधकांनी आधीच रचला होता, पण पटोलेंच्या राजीनाम्यानंतर त्यांना आयती संधी मिळाली. राज्यपालांनी ही निवडणूक होऊ दिली नाही, त्याचा फटका सरकारला बसला. त्यामुळं नाना पटोले यांनी आपल्या पदावरुन राजीनामा द्यायला नको होता, अन्यथा आमचं सरकार अद्यापही टिकून राहिलं असतं"