'एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्या सोबत होते', राऊतांची पत्रकारांसमोरच कबुली

Sanjay Raut
Sanjay Raut sakal

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून म्हणजे कालपासून एकनाथ शिंदेंशी कोणताही संपर्क झालेला नाही. शिंदेंसोबतच शिवसेनेचे १३ आमदारही संपर्कात नाहीत. हे सर्वजण गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. गुजरातच्या ले मेरिडियन हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आहे. (Sanjay Raut Speaks onEknath Shinde)

विधानपरिषदेला शिवसेनेची मतं फुटली आणि त्यानंतर या बंडाला सुरुवात झाली आहे. यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने तातडीने बैठका बोलावल्या आहेत. वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नेत्यांना बोलावलं आहे. तर दिल्लीत शरद पवार यांनीही सूत्र हालवण्यास सुरुवात केली. यातच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतील अंतर्गत विषयावर भाष्य केलं आहे.

नक्कीच काही आमदार मुंबईत नाही, असं ते म्हणाले. सुरत हा भाजपचा गड आहे. राज्यातील भाजपकडून ही खेळी केली जात असून सरकार अस्थिर करण्याचा आणखी एक प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केला. काही मदारांशी संपर्क होत नाही, हे सत्य असल्याची कबूली त्यांनी दिली. काही आमदारांशी संपर्क झालाय. काही आमदारांना गैर समाजातून बाहेर काढण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

Sanjay Raut
Eknath Shinde LIVE : वेळ साधली? देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

संजय राऊत पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदे बाहेर आहेत हे खरं, पण त्यांच्याशी संपर्क झालाय. शिवसेनेत फूट होईल असं म्हटलं जातंय, पण तसं होणार नाही. संशयाचं वातावरण तयार केलं गेलंय, पण ते दूर होईल. आमची वर्षावर बैठक आहे, आम्ही जातोय. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होत असते. सेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणं आणि ते शक्य नाही. राज्यात अस्थिरता करता येणार नाही. अस्थिरत करता येणार नाही. मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा करता, कोणत्या दिशेला पावलं चाललीयत , सेनेला कमजोर केलं पाहिजे मग मुंबई मिळवता येईल, हे फार मोठं संकट आहे."

मला वाटत नाही, एकनाथ शिंदे काल पर्यंत आमच्या सोबत होते , शिंदे आमचे जिवा भावाचे शिवसैनिक आहेत. त्यांच्याशी सोबत आमचा संपर्क होत नाही, तो पर्यत बोलणार नाही, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. तसंच मुख्यमंत्री सर्व खात्यांचा आढावा घेत असतात, तरीही त्यातून काही गैर समज झाले असतील ,तर ते दूर होतील, असंही त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com