esakal | रावसाहेब दानवेंच्या विधानाचा संजय राऊत यांच्याकडून समाचार
sakal

बोलून बातमी शोधा

रावसाहेब दानवेंच्या विधानाचा संजय राऊत यांच्याकडून समाचार

शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा  चांगलाच समाचार घेतला आहे.

रावसाहेब दानवेंच्या विधानाचा संजय राऊत यांच्याकडून समाचार

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. दानलवे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिला आहे. प्रतिक्रिया देताना राऊतांनी पुरावे देण्याची मागणी केली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले. त्यावर राऊतांनी टीका करत जर केंद्र सरकारच्या मंत्र्यांकडे अशी माहिती असेल तर संरक्षण मंत्र्यांनी चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारला तोडगा काढायचा का नाही, हा प्रश्न आहे. सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सारखे आहेत. सरकारला तोडगा काढायचा असता तर निघाला असता, असा टोला देखील राऊतांनी लगावला.

जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत. 

बिहारमध्ये एपीएमसीमध्ये या सुधारणा केल्या होत्या. आज बिहारमधील धान्याचा ९०० आणि पंजाबमध्ये १५०० अशी माझी माहिती आहे.  आता बिहारच्या शेतकऱ्याने पंजाबला जायचं का ? भाजप शासित राज्यात या सुधारणा लागू करायला हव्यात. शेतकरी आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा आहे. अराजकता माजवणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. सरकारनं शेतकऱ्यांवर कायदा लादू नये, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संपूर्ण देश चिंतेत आहे की लाखो शेतकरी सिंघू बॉर्डरवर लढत आहेत. सरकारला खरंच तोडगा काढायचा असता तर तोडगा निघाला असता. पण बहुधा सरकारला हा विषय असाच लोंबकळत ठेवायचा आहे, असंही राऊत म्हणालेत.

काय म्हणाले रावसाहेब दानवे 

रावसाहेब दानवे तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन आणि पाकिस्तानशी असल्याचा दावा केला. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांच्या अजब दाव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Sanjay raut taunt raosaheb danve china pakistan behind farmers protest