Sanjay Raut | 'उतराला लागलेली गाडी आणि...' फडणवीसांची सभा संपताच राऊतांचं ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Allegations on Kirit Somaiya

'उतराला लागलेली गाडी आणि...' फडणवीसांची सभा संपताच राऊतांचं ट्वीट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईतील बीकेसी मैदानात सभा पार पडली. या सभेतून त्यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राजकारण्यांवर त्यांनी सडकून टीका केली. (Uddhav Thackeray BKC Rally)

त्यांच्या या टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही सभा पार पडली. या सभेला भाजपनं हिंदी भाषिक संकल्प संमेलन असंही म्हटलं आहे. (Uttar Sabha of Devendra Fadnavis)

दरम्यान ही सभा संपताच संजय राऊत यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut Latest News)

उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे, असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावलाय.