esakal | 'जहाँ हमारे नाम से आग लग जाती है', संजय राऊतांचे नवीन ट्वीट
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena MP Sanjay Raut

'जहाँ हमारे नाम से आग लग जाती है', संजय राऊतांचे नवीन ट्वीट

sakal_logo
By
विराज भागवत

त्याचसोबत त्यांनी 'जय महाराष्ट्र' असंही ट्वीट केलं आहे

मुंबई: काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची गुजरातमध्ये गुप्त भेट झाल्याचे वृत्त आले होते. त्या भेटीचा पवारांनी इन्कार केला, तर अमित शाह यांनी, 'काही गोष्टी सार्वजनिकरित्या बोलायच्या नसतात', असं सांगितलं होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी (Pm Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची दिल्लीत अधिकृत पण वैयक्तिक स्तरावरील भेट झाली. या दोन्ही भेटींच्या चर्चांची धूळ बसेपर्यंत शनिवारी आशिष शेलार (Ashish Shelar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीची चर्चा रंगली होती. पण अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. एक शायरी ट्वीट (Tweet) करत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. (Sanjay Raut Tweets Shayari over Secret Meeting with BJP Leader Ashish Shelar)

हेही वाचा: भाजपच्या आशिष शेलारांशी गुप्त भेट? संजय राऊतांनी दिलं उत्तर

आशिष शेलार आणि संजय राऊत यांच्या भेटीची शनिवारी जोरदार चर्चा रंगली होती. या चर्चेवर एका ट्वीटच्या माध्यमातून राऊत यांनी पडदा टाकला. अशी भेट म्हणजे निव्वळ अफवा आहे. मी ज्यांच्या डोळ्यात खुपतो किंवा ज्यांना माझा त्रास वाटतो, अशी लोकं मुद्दाम या अफवा पसरवत आहेत, अशा आशयाची शायरी पोस्ट करत त्यांनी आपलं उत्तर दिलं. "हमारी अफवाह के धुएं वही से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है", असं ट्वीट त्यांनी केलं. त्याचसोबत त्यांनी जय महाराष्ट्र असंही ट्वीट केलं आहे.

पत्रकारांशी बोलतानाही राऊतांनी शेलारांशी भेट झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. "महाराष्ट्रातील दोन मोठे नेते भेटले तर त्यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण काय? पण मुळात अशी भेट झालीच नाही. मी काल कामात होतो. कोणीतरी अफवा पसरवली आहे. अशा अफवा पसरल्याने राजकारण हलतं का? अस्थिर होतं का? अजिबात होत नाही... उलट अशा अफवा पसरल्याने आमच्या तीन पक्षाचे नेते एकत्र येतात. त्यामुळे असे अफवा पसरवणारे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील", असा टोला त्यांनी विरोधी पक्षाला लगावला.

loading image
go to top