esakal | हिशोब द्यावाच लागेल, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

हिशोब द्यावाच लागेल, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

भाजप नेते किरीट सोमय्यांनीही ईडीच्या नोटीशीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 

हिशोब द्यावाच लागेल, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस  पाठवली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी  शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीच्या नोटीसीवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्यांनीही ईडीच्या नोटीशीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी एचडीआयएलसोबत संजय राऊत यांचा संबंध काय?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसंच सोमय्या यांनी एक ट्वीट करत तुम्ही लाभार्थी आहात, त्यामुळे तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल, असा इशाराही संजय राऊतांना दिलाय. चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल, असं टीकास्त्र सोमय्यांनी राऊतांवर सोडलं आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. सोमय्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, वयोवृद्ध गुंतवणूकदार ते पीएमसी बँक, पीएमसी बँक ते HDIL(वाधवान बंधू), वाधवान बंधू ते प्रवीण राऊत, प्रवीण राऊत ते माधूरी प्रवीण राऊत, माधूरी प्रवीण राऊत ते वर्षा / संजय राऊत, गेल्या काही महिन्यात EDकडून 3 नोटीस, पण उत्तर एकालाही नाही, का? लाभार्थी आहात तर उत्तर द्यावेच लागेल. 

सोमय्यांनी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीच्या समन्सवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

संजय राऊत का घाबरतात? प्रामाणिक असाल तर टेंशन घेऊ नका? शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर चिठ्ठी लिहीतात की पीएमसी बँकेत त्यांचे कोटी रुपये पैसे फसले तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या खात्यात हे पैसे जातात. चूक केलीये तर हिशोब तर द्यावाच लागेल, असा इशारा किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांना दिला.

Sanjay raut wife varsha raut ed notice bjp kirit somaiya

loading image