
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात ते हॉटेलच्या खोलीत सिगारेट हातात घेऊन बसलेले दिसत आहेत. त्यांच्या बाजूला पैशांनी भरलेली बॅग दिसत असल्याने या व्हिडिओने राज्यभर चर्चेला उधाण आलं आहे. या प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे.