सानपाडा-तुर्भे उड्डाणपूल पाच पदरी होणार; आजपासून कामाला प्रारंभ; वाहतूक कोंडी सुटणार

सुजित गायकवाड
Wednesday, 9 September 2020

शीव-पनवेल महामार्गावरील सानपाडा-तुर्भे पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावरील सानपाडा-तुर्भे पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्या मार्गिका तयार करणार आहेत. त्यासाठी सानपाडा येथील उड्डाणपुलाहून तुर्भेकडे जाणारा भाग बुधवारी (ता. 9) पाडण्यात आला. 

'आज  मेरा घर तूटा है कल तेरा घमंड तूटेगा'; मुंबईत पोहचल्यानंतरही कंगनाचा घणाघात सुरूच

शीव-पनवेल महामार्गाचे 2016 ला सहा पदरीकरण करण्यात आले. त्यात कळंबोली जंक्शन ते मानखुर्द सिग्नलपर्यंत महामार्गावर सहा मार्गिका आहेत. मात्र, महामार्गावरील उड्डाणपुलांचा विकास केला नाही. अनेक वर्षांपासून उड्डाणपुलांवर दोन मार्गिका आहेत. महामार्गाचे रुंदीकरण केल्यामुळे वाढलेली वाहने वेगात येऊन या अरुंद उड्डाणपुलांवर अडकून बसतात. उड्डाणपूल अरुंद असल्यामुळे मानखुर्द येथील उड्डाणपूल; तसेच सानपाडा-तुर्भे उड्डाणपुलावर रोज वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मानखुर्द आणि सानपाडा-तुर्भे येथील उड्डाणपुलांवर 158 कोटी रुपये खर्च करून रुंदीकरण केले जाणार आहे. या उड्डाणपुलांखालून जाणाऱ्या लोकलमुळे उड्डाणपुलांचा विकास रखडला होता. मात्र, आता रेल्वेने मंजुरी दिल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने महारेल कॉर्पोरेशनला उड्डाणपूल रुंदीकरणाचे कंत्राट दिले आहे. 

'कंगनाला जास्त महत्व देऊ नका'; 'मातोश्री'हून पक्ष प्रवक्त्यांना आदेश

आज सकाळपासून सानपाडा-तुर्भे उड्डाणपुलावरील तुर्भेच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करून पुलाचा एक भाग पाडण्यात आला. तसेच पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरही रुंदीकरण करण्यात येणार आहे.

 

रुंदीकरणाच्या कामाला आठ महिन्यांची मुदत आहे. हे काम झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
- किशोर पाटील,
कार्यकारी अभियंता

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanpada-Turbhe flyover to be five-lane, work to start from today; The traffic jam will be solved