"सावित्री ज्योती'ने घेतला प्रेक्षकांचा निरोप; टीआरपी नसल्यामुळे ही मालिका बंद

संतोष भिंगार्डे
Saturday, 26 December 2020

"सोनी मराठी' वाहिनीवर यावर्षी जानेवारी महिन्यात "सावित्री ज्योती' ही मालिका सुरू झाली होती. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित या मालिकेला अल्पावधीतच चांगली लोकप्रियता मिळाली. या मालिकेचा आज अखेरचा भाग प्रदर्शित झाला. 

मुंबई  ः "सोनी मराठी' वाहिनीवर यावर्षी जानेवारी महिन्यात "सावित्री ज्योती' ही मालिका सुरू झाली होती. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित या मालिकेला अल्पावधीतच चांगली लोकप्रियता मिळाली. या मालिकेचा आज अखेरचा भाग प्रदर्शित झाला. 

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही दिवसांपूर्वी टीआरपी नसल्यामुळे ही मालिका बंद करण्यात येणार असल्याची बातमी आली आणि सगळ्यांना धक्का बसला होता. टीव्ही इंडस्ट्रीत याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. अखेर आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्त्व आणि ते करत असलेले समाज सुधारण्याचे काम इतरांना पटले. तसेच जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा लढा हा अन्यायाविरुद्ध आणि अनिष्ट चालींविरुद्ध होता. कोणत्याही समाजाविरुद्ध नाही, असे दाखवत या मालिकेने आपला निरोप घेतला. या मालिकेत अभिनेता ओंकार गोवर्धन याने महात्मा जोतिबा फुले, तर अभिनेत्री अश्‍विनी कासार हिने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली होती. या मालिकेला जनतेचा जो अभूतपूर्व पाठिंबा मिळाला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असे मत या मालिकेचे संशोधक व सल्लागार प्रा. हरी नरके यांनी मांडले. 

Savitri Jyoti bids farewell to the audience the series is closed due to lack of TRP

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitri Jyoti bids farewell to the audience the series is closed due to lack of TRP