esakal | पनवेल/एलटीटी ते गोरखपूर विशेष ट्रेन्सचे वेळापत्रक जाहीर; 27 सप्टेंबरपासून IRCTCवर बुकिंग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल/एलटीटी ते गोरखपूर विशेष ट्रेन्सचे वेळापत्रक जाहीर; 27 सप्टेंबरपासून IRCTCवर बुकिंग सुरू

मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल/एलटीटी ते गोरखपूर विशेष ट्रेन्सचे वेळापत्रक जाहीर; 27 सप्टेंबरपासून IRCTCवर बुकिंग सुरू

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन विशेष पूर्णपणे आरक्षित गाड्या असणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर साप्ताहिक विशेष 05063 विशेष रेल्वेगाडी 28 सप्टेंबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोरखपूर येथून दर सोमवारी पहाटे 5.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दुसर्‍या दिवशी 4 वाजता पोहोचेल.

05064 विशेष रेल्वेगाडी 29 सप्टेंबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी 5.50 वाजता सुटेल आणि तिस-या दिवशी 4.30 वाजता गोरखपूरला पोहोचेल. दरम्यान नियमित गाडी क्रमांक 15063, 15064 प्रमाणेच थांबे राहणार आहे. या ट्रेन मध्ये एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित,  नऊ शयनयान, 10 द्वितीय आसन श्रेणी राहणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा कोविड क्रुसेडर्स 2020 अवॉर्डने गौरव

पनवेल-गोरखपूर विशेष (आठवड्यातून 4 दिवस)

05065 विशेष रेल्वेगाडी 29 सप्टेंबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोरखपूर येथून दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी सकाळी 5.30 वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी 4.20 वाजता पनवेल येथे पोहोचेल. 05066 विशेष रेल्वेगाडी 30 सप्टेंबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी 5.50 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 4.30 वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. दरम्यान नियमित गाडी क्रमांक 15065, 15066 अनुसार थांबे राहणार आहे. तर या विशेष गाड्यांचे बुकिंग 27 सप्टेंबर पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होणार असून, केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top