आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु; कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची सक्ती

महेंद्र दुसार
Wednesday, 27 January 2021

राज्य सरकारच्या आदेशानंतर आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

अलिबाग :  तब्बल दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर 5  वी ते 8 वी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत.  जुन्या मैत्रिणी, मित्र अनेक दिवसांनी भेटत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. राज्य सरकारच्या आदेशानंतर आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत.  रायगड जिल्ह्यात 894 शाळा असून 31 हजार 912 इतके विद्यार्थी शाळेत येणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही काही शाळांमध्ये पालक सभा न झाल्याने अनेक शाळांमध्ये उपस्थिती बेताची होती.

 
दरम्यान, राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचे आदेश दिल्यानंतर रायगड जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे. 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर रोजी सुरु झाले आहेत. कोरोना काळानंतर तब्बल 10 महिन्यांनी आजपासून रायगड जिल्ह्यात 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरू झालेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करत वर्ग भरवण्यात येत आहेत. शाळा सुरू करताना गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय प्राधान्याने घेण्यात येत आहेत. शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षण सुरुच होते. परंतु रायगड जिल्ह्यात नेट कनेक्टिव्हीटीचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झालेले  आहे. राहिलेला अभ्यासक्रम पुर्ण करण्याचा शिक्षणकांचा प्रयत्न असणार आहे.  

मुंबई, रायगड , परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

रायगड जिल्ह्यात 5 वी ते 8 पर्यंत 894 शाळा आहेत. यामध्ये 1 लाख 25 हजार 045 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिवकण्यासाठी 9 हजार 995 शिक्षण आहेत. या सर्व शिक्षकांच्या कोरोना टेस्ट करुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.  सुरु झालेल्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी   31 हजार 912 इतके विद्यार्थी शाळेत येणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही काही शाळांमध्ये पालक सभा न झाल्याने हे वर्ग सुरू झालेले नाहीत. अनेक पालकांनी हमीपत्र दिलेले नाही. यामुळे उपस्थितीवर परिणाम होत आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. 

 

कोरोना नियमांचे पालन करत वर्ग सुरु करण्यात येत आहेत. शिक्षकांनी कोणत्या सुचनांचे पालन करावे, यासंदर्भातील माहिती शाळांना देण्यात आलेली आहे. पुर्वीप्रमाणे शाळा सुरु करण्याचा प्रयत्न राहणार आहे. 
-बाळासाहेब थोरात

शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग (राजिप)

Schools fifth through eighth start today in raigad Enforcement of corona preventive measures

-----------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools fifth through eighth start today in raigad Enforcement of corona preventive measures