रायगड जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू; निर्णयाची सक्ती नाही

रायगड जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू; निर्णयाची सक्ती नाही

अलिबाग : कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्याने मुंबईसह ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु रायगड जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा पुर्वीच्या निर्णयानुसार सोमवार (ता.23) पासून सुरु होणार आहे. हा निर्णय सक्तीचा नसुन ठराविक भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिला तर त्या विभागातील शाळा सुरु होणार नाहीत, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

शाळा सुरु करण्याचा हा निर्णय राज्य शासनाने स्थानिक प्रशासनावर सोडला होता. त्याचबरोबर पालकांकडून सुचना मागविण्यात आल्या होत्या, त्यानुसार रायगड जिल्ह्यातील कोणत्याही भागातून शाळा सुरु करु नयेत अशी मागणी आतापर्यंत तरी आलेली नाही, असे अदिती तटकरेंनी सांगितले. पोलादपुर सारख्या तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अशा ठिकाणी शाळा सुरु करण्यात कोणताही धोका नाही. मात्र, याच दरम्यान पनवेल, उरण सारख्या तालुक्यातील पालकांनी 23 नोव्हेंबरपर्यंत हरकत घेतल्यास त्या ठराविक विभागातील शाळा सुरु होणार नाहीत, असे अदिती तटकरे यांचे म्हणणे आहे.

रायगड जिल्हा प्रशासनाने सोमवार पासून इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांनी दिली. या परवानगीनुसार रायगड जिल्ह्यातील 1 लाख 44 हजार 565 विद्यार्थी सोमवारपासून वर्गात येण्यास सुरुवात होणार आहे. शाळा सुरु होण्यापुर्वी 10 हजार 800 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही आरटीपीसीआर टेस्ट गरजेचे करण्यात आली आहे.

Schools in Raigad district start from Monday The decision is not binding

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com