esakal | 'TYBSC कम्प्युटर सायन्स' सत्र-६ चा निकाल जाहीर, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Result

'TYBSC कम्प्युटर सायन्स' सत्र-६ चा निकाल जाहीर, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अंतिम वर्षाच्या मे २०२१ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या (Summer time) विज्ञान शाखेचा (Science Faculty) तृतीय वर्ष बीएस्सी काम्प्युटर सायन्स (Computer science) सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात (Result Declared) आला असून या परीक्षेचा निकाल ८४.२३ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. ( Science Faculty Tybsc computer science result has been declared - nss91)

या परीक्षेत एकूण ३ हजार ०२४ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ३ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ७५८ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ९ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४३ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. २०२१ च्या उन्हाळी सत्राचे कालपर्यंत विद्यापीठाने ८१ निकाल जाहीर केले आहेत.

हेही वाचा: अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजन विरोधात ७१ पैकी ४६ प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

विद्यापीठाने काल दिवसभरात एकूण ११ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यात बीएस्सी काम्प्युटर सायन्स सत्र ६ सोबत बीई ( मेकॅनिकल इंजिनियरिंग ) सत्र ७, बीकॉम ( फायनान्शियल मॅनेजमेंट ) सत्र ५, बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट ) सत्र ५, बीई ( सिव्हील इंजिनियरिंग ) सत्र ८, बीई ( काम्प्युटर इंजिनियरिंग ) सत्र ८, बीई ( केमिकल इंजिनियरिंग ) सत्र ७, बीकॉम ( इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट ) सत्र ५, बीकॉम ( फायनान्शियल मॅनेजमेंट ) सत्र ६, बीएस्सी सत्र ५ (७५.२५), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज ) सत्र ५ असे ११ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले.

loading image
go to top