esakal | मुंबई विद्यापीठ : 'TYBSC सत्र-६' परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Result

मुंबई विद्यापीठ : 'TYBSC सत्र-६' परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्राच्या पारंपारिक विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र-6 (BSC) या परीक्षेचा निकाल (Exam Result) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल 74.44 टक्के लागला आहे. ( Science Faculty TYBSC section six result has been Declared- nss91)

विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र-6 या परीक्षेत एकूण 7 हजार 600 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 10 हजार 642 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 10 हजार 610 एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर 32 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत 186 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने 63 निकाल जाहीर केले आहेत.

हेही वाचा: शिक्षकांना खुशखबर , सप्टेंबर महिन्यात होणार 'TET' परीक्षा

यासोबत आज 8 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून त्यात विद्यापीठाने बीएस्सी समवेत बीई (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग) सत्र 8,बीई (आटोमोबाईल इंजिनिअरिंग) सत्र 8, बीई (इन्स्ट्रुमेन्टेशन इंजिनिअरिंग) सत्र 8, मास्टर ऑफ म्युझिक (हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक ) भाग 2, तृतीय वर्ष बी.म्युझिक (हिंदुस्थानी क्लासिकल इन्स्ट्रुमेंट म्युझिक पर्क्युसन ), तृतीय वर्ष बी.म्युझिक (हिंदुस्थानी क्लासिकल व्होकल म्युझिक ), तृतीय वर्ष बी.म्युझिक (हिंदुस्थानी क्लासिकल इन्स्ट्रुमेंट म्युझिक नॉन पर्क्युसन ) या 8 निकालांचा समावेश आहे.

loading image