लॉकडाऊन : ठाण्यात दुकानदारांनी 'या' नियमांचं पालन न केल्यास दुकान सील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला असून सर्व  काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच प्रभाग समितीमधील जे दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्यांची

ठाणे : ठाणे जिल्हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आला असून सर्व  काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच प्रभाग समितीमधील जे दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्यांची दुकाने सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व परिमंडळ उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत.

मोठी बातमी  : #COVID19 : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या पाच हजारी पार...

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी  सिंघल यांनी मंगळवारी (ता. 21) सर्व अधिकाऱ्यांची बैठक कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीमध्ये त्यांनी बाधित व्यक्तींच्या संपर्कातील अति जोखीम गटातील व्यक्तींची माहिती आणि ज्या ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केले आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. याबाबत कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

नक्की वाचा :  केंद्रीय पथकापुढे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा काढला 'हा' महत्त्वाचा विषय; मोदी देणार का परवानगी ? 

तसेच विलगीकरण  कक्षातील व्यक्तींचे अहवाल ही लवकरात लवकर तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश ही त्यांनी दिले. तसेच बाधीत रूग्णांच्या संख्येनुसार प्रभाग समितीनिहाय रेड झोन आणि झोन निश्चित करून त्याची माहिती तात्काळ मुख्यालयास कळवावी. तसेच प्रभाग समितीमध्ये हॅाटस्पॅाट असल्यास त्या अनुषंगाने नियोजन करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही  सिंघल यांनी या बैठकीत दिल्या.
 

Seal the shops of law breakers Order of Thane Municipal Commissioner

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seal the shops of law breakers Order of Thane Municipal Commissioner