‘परे’ची दुसरी एसी लोकल मेअखेर सेवेत

‘परे’ची दुसरी एसी लोकल मेअखेर सेवेत

मुंबई - पश्‍चिम रेल्वेची दुसरी वातानुकूलित (एसी) लोकल मे महिनाअखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मेधा आणि भेल बनावटीच्या दोन लोकल मुंबईत दाखल झाल्या आहेत. मेअखेरीस सेमी वातानुकूलित लोकल मुंबईत धावणार आहे. दोन्ही लोकल पश्‍चिम रेल्वेला मिळल्यामुळे मध्य रेल्वेच्या ४५ लाख प्रवाशांना वातानुकूलित लोकलसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईकरांसाठी पहिली एसी लोकल पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावत आहे. त्या लोकलमध्ये वारंवार तांत्रिक दोष आढळले अाहेत. नव्याने दाखल होणाऱ्या दुसऱ्या एसी लोकलमधून ते दूर करण्याचे उद्दिष्ट रेल्वेच्या चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्‍टरीसमोर (आयसीएफ) आहे. पहिल्या लोकलमध्ये विजेची उपकरणे आदी सर्व जबाबदारी भारत हेवी इलेक्‍ट्रिकल लि. (भेल)वर सोपवण्यात आली होती. नवीन एसी लोकलमध्ये सर्व विद्युत उपकरणे डब्याखालून जातील यावर भर दिला आहे. त्यामुळे वीजबचतही साधली जाऊन मोटारची क्षमताही ५० टक्‍क्‍यांनी वाढवण्यात आली आहे. नव्या एसी लोकलची मोटार आणि इतर विद्युत उपकरणे लोकलच्या तळाला बसविण्यात आल्याने प्रवाशांना बसायला अधिक जागा उपलब्ध आहे. याआधीच्या गाडीपेक्षा ३५० अधिक प्रवासी नव्या लोकलमध्ये सामावू शकतील. एसी लोकलमध्ये आसन क्षमता १० टक्‍क्‍यांनी वाढवण्यात आली आहे. फलाटावर पोहोचल्यानंतर कमी वेळेत दरवाजे उघड-बंद होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १२ पैकी सहा डब्यांमध्ये मोटार बसवण्यात आली आहे. सद्यस्थितीत चार डब्यांमध्ये मोटार आहे, असे पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दुसऱ्या एसी लोकलची चाचणी पूर्ण झाल्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. आणखी एका एसी लोकलची चाचणी अद्याप सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन चाचणी केली जात आहे.
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी,  पश्‍चिम रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com