पालकांनो..! तुमच्या मुलांची सुरक्षा धोक्यात...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

खासगी शाळांच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेकडून पालिका शाळेतही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; मात्र पालिका प्रशासनाला आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विसर पडला आहे. या शाळांमध्ये सीसी टीव्ही बसविण्याच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळून एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही हे काम निविदाप्रक्रियेत अडकले आहे.

नवी मुंबई : खासगी शाळांच्या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेकडून पालिका शाळेतही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; मात्र पालिका प्रशासनाला आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विसर पडला आहे. या शाळांमध्ये सीसी टीव्ही बसविण्याच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळून एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही हे काम निविदाप्रक्रियेत अडकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही बातमी वाचली का? पुस्तक म्हणजे फॅशन नाही

राज्य सरकारच्या निर्णयानुसार खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसी टीव्ही बसविण्यात आले आहे. पालिका प्रशासनानेही  यासाठी पुढाकार घेत, आपल्या शाळांमध्ये सीसी टीव्ही बसविण्यासाठी बाजारभाव मागवले होते. त्यानुसार सर्व शाळांमध्ये एकूण ४१२ डोम कॅमेरे, १९५ फिक्‍स कॅमेरे असे एकूण ६८७ सीसी टीव्ही बसवणे आणि पाच वर्षांसाठी त्यांची देखभाल, दुरुस्ती यासाठी पाच कोटी २४ हजार ९०१ इतक्‍या खर्चाच्या प्रस्तावाला २० ऑक्‍टोबर २०१८ रोजी झालेल्या महासभेत मान्यताही मिळाली. या कामासाठी तीन वेळा  निविदा प्रक्रियाही राबविण्यात आल्या असून, चार कंत्राटदारांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला होता; मात्र तांत्रिकदृष्ट्या ते अपात्र ठरले आहेत. निविदा प्रक्रियेत अडकलेल्या या प्रस्तावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही बातमी वाचली का? या पिकामुळे शेतकऱ्यांचे चेहरे पांढरे

मैदानांमध्ये वाहन पार्किंग
शहरात पार्किंगसाठी जागेची कमतरता असल्याने, वाहने कुठे उभी करायची, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात. इतकेच काय; तर पालिका शाळा असलेल्या मैदानातही बेकायदा वाहने पार्किंग केली जात आहेत. यामधील अनेक वाहने एकाचजागेवर उभी राहत असल्याने विद्यार्थ्यांना खेळताना अडचण निर्माण होत असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ही बातमी वाचली का? वाढीव बिलामुळे माणगावकरांना विजेचा शॉक

सुरक्षा रक्षकांची कमतरता
पालिकेने शाळांच्या प्रशस्त इमारती बांधल्या; मात्र या इमारतींना पुरेसे सुरक्षा रक्षक नाहीत. त्यामुळे शाळेमध्ये ये-जा करणाऱ्या बाहेरील नागरिकांच्या नोंदी होत नसून, यामुळे परिसराची सुरक्षा धोक्‍यात आली आहे.

पालिका शाळांमध्ये सीसी टीव्ही बसविण्याच्या निविदा शिक्षण विभागाच्या माध्यमातून मागविण्यात आल्या होत्या; परंतु त्यामध्ये काही  तांत्रिक अडचणी होत्या. त्या दूर करण्यात आल्या अाहेत.  त्यामुळे आता नव्याने पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून निविदा मागविण्यात येत आहेत. लवकरच पालिका शाळांमध्ये सीसी टीव्ही बसविण्याची प्रक्रिया  राबविण्यात येईल.
- सुरेंद्र पाटील, नवी मुंबई महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security of students at Navi Mumbai Municipal School at risk