हतबलता ! "यहा भुखे मरने से गाव के मिट्टी में जा के मरेंगे, हमे जाने दो..."

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

लॉकडाऊन कब हटेगा पता नाही, क्या करेंगे, क्या खाएंगे, यहा भुके प्यासे कैसे बैठे रहेंगे, अशी हतबलता दुकाने आणि हॉटेलांमध्ये काम करणारे मजूर व्यक्त करीत आहेत.

मुंबई, ता. 29 - लॉकडाऊन कब हटेगा पता नाही, क्या करेंगे, क्या खाएंगे, यहा भुके प्यासे कैसे बैठे रहेंगे, अशी हतबलता दुकाने आणि हॉटेलांमध्ये काम करणारे मजूर व्यक्त करीत आहेत. यहा भुखे मरने से गाव के मिट्टी में जा के मरेंगे, हमे जाने दो, अशी याचना ते करू लागले आहेत. 

विक्रोळीच्या पूर्वेस दुकाने आणि हॉटेलांमध्ये काम करणारे मजूर  लॉकडाऊनमुळे वैतागले आहेत. एका दहा बाय दहाच्या झोपड्यात सात ते आठ जण दाटीवाटीने  रहात आहे. त्यांना रोजच्या खण्याबाबत विचारले असता राम गुप्ता नावाचा मजूर म्हणाला की,   कोई लोग फुटपाथकी खाऊ गली मे जो भी मिलता था उसके उपर दिन निकालते थे, कुछ हॉटेलमे काम करते है. हॉटेलका अनाज भी खतम धुवा है, माँलिक भी कितने खाना देगा, हॉटेल बंद है, उनकी भी मजबुरी है, अभी रोज दो टाइम खानेका प्रॉब्लेम हुवा है. कभी कोई खानेके पॉकेट बाटते है, कभी मिलता भी नाही, यहा भुके मरने से हमे गाव छोड दो, अशी याचना मजूर करीत आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठीची 'गुड न्यूज' लवकरच येणार, राजकीय सूत्र सांगतायत...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य आणि, जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे.  ठिकठिकाणी परराज्यातील मजूर अडकून पडले आहे. मुंबईत मोठ्या संख्येनं मजूर अडकले आहेत. आता या मजुरांना त्यांच्या गावी कधी आणि कसे सोडण्यात यावे, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले आहे. मात्र त्याबाबत अध्याप निर्णय झालेला नाही.

वांद्रे भागात गेल्या काही दिवसांपूर्वी गावी जाण्यासाठी मोठा जमाव जमला होता. सरकार आता काय निर्णय घेणार या कडे सर्व परप्रांतीय मजुरांचे लक्ष लागले आहे.

see what migrant workers are saying in lockdown read full story

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: see what migrant workers are saying in lockdown read full story