मुख्यमंत्री ठाकरे आणि भाजपा नेत्यांमध्ये दिसली अनोखी 'दोस्ती'

मिलिंद नार्वेकर :- उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घरेण्याचा प्रयत्न केला आहे का?
मुख्यमंत्री ठाकरे आणि भाजपा नेत्यांमध्ये दिसली अनोखी 'दोस्ती'

मुंबई: राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकार (mva govt) आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये वेगवेगळ्या मुद्यांवरुन संघर्ष सुरुच आहे. मागच्याच आठवड्यात दादर शिवसेना भवनजवळ शिवसेना (shivsena) आणि भाजपा (bjp) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या विषयांवरुन भाजपाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav thackeray) अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली जाते. सध्या राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तीन पक्ष एकाबाजूला आणि विरुद्ध दिशेला भाजपा असा संघर्ष सुरु आहे. (Seen friendship between chief minister uddhav thackeray & bjp leaders in vidhan bhavan area)

शिवेसना-भाजपामधले आरोप-प्रत्यारोप पाहिले की, कधी काळी हे दोन पक्ष एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र होते का? असा प्रश्न पडतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्षांमध्ये इतके टोकाचे मतभेद निर्माण झाले असले, तरी आज विधान भवनाच्या आवारात एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. हे दृश्य पाहिल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण इतर राज्यांपेक्षा कसं वेगळं आहे, ते लक्षात येतं.

महाराष्ट्राच्या राजकारणात शाब्दीक संघर्ष कितीही टोकाचा झाला तरी त्यात वैरत्वाची भावना कधीच नसते. राजकारणातील वैरत्वाची ही भावना उत्तर आणि दक्षिणेकडच्या राजकारणात दिसते. वैचारिक मतभेदांना वैचारिक पातळीवर ठेवावेत, त्यामुळे व्यक्तीगत संबंधात कटुता येऊ नये, ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे. आज विधान भवनाच्या आवारात हेच दृश्य दिसले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानभवनात आले होते. मुख्यमंत्री विधानभवनातून निघत असताना, प्रविण दरेकर, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड तिथे उभे होते. मुख्यमंत्री गाडीत बसले होते, यावेळी तिन्ही नेत्यांनी गाडीत बसलेल्या मुख्यमंत्र्यांसोबत काही मिनिट संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि भाजपाचे तिन्ही नेते हास्यविनोदात रमले होते. ही भेट सुरु असताना मागच्या गाडीत बसलेले मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले. त्यावेळी पुढे असे संभाषण झाले

मिलिंद नार्वेकर :- उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घरेण्याचा प्रयत्न केला आहे का?

प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही येऊ शकतो

मिलिंद नार्वेकर :- यांना आताच गाडीत टाका, शिबबंधन बाधूया

प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com