esakal | 'सेल्फी विथ खड्डा' फोटोत दिसणार खड्डा गाडणार - मुंबई महापौर | Mumbai mayor
sakal

बोलून बातमी शोधा

Kishori-Pednekar

'सेल्फी विथ खड्डा' फोटोत दिसणारे खड्डे गाडणार - मुंबई महापौर

sakal_logo
By
सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून भाजपाने (bjp) प्रत्येक खड्ड्यांचे फोटो मागवून घेत त्यांचे प्रदर्शन भरवलय. आज २ ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीच्या दिवसाचे औचित्य साधून भाजपा गांधीगिरीच्या मार्गाने खड्ड्यांबाबत आंदोलन (protest) केलं जातंय. महापालिका मुख्यालयासमोरच हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आशीष शेलार (Ashish shelar) उपस्थित आहेत. या आंदोलना दरम्यान "सेल्फी विथ खड्डा स्पर्धा २०२१" (selfie with pothole) भाजपने आयोजित करुन एका विजेत्या महिलेला पारितोषिक देखील दिलंय.

भाजपाच्या 'सेल्फी विथ खड्डा स्पर्धे'वर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी पॉझिटिव्ह दृष्टीकोनातून बघते. आता पाऊस थांबलाय. आधी जे खड्डे पडलेत किंवा नवीन खड्डे तयार झालेत, ते बुजवले पाहिजेत. सेल्फी विथ खड्डा स्पर्धेत जे फोटो येतील, ते गाडणार बुजवणार असे महापौर म्हणाल्या.

हेही वाचा: चीनने सैन्य तैनाती वाढवताच भारताकडून K9-वज्र होवित्झर रेजिमेंट तैनात

"मी पॉझिटिव्ह आहे. अपण चांगलं काम करताय. तुम्ही विरोधी पक्षात आहात. तुमचा अधिकार आहे. कुठलही आंदोलन करताना कोविड १९ अजूनही संपलेला नाही. दोन डोस घेतलेले बाधित होत आहेत त्यामुळे काळजी घ्या" असा सल्ला दिला.

हेही वाचा: रिझर्व्ह बँकेला सहकार नको का? - विद्याधर अनास्कर

नवरात्रीबद्दल महापौर म्हणाल्या...

"गरबा खेळायला मुंबई वगळता इतर ठिकाणी परवानगी आहे. मात्र दोन डोस घेऊनही लोक बाधित होत आहेत. मग अशा परिस्थितीत नवरात्रीत गरबाला मान्यता कशी द्यायची? नंतर जर बाधित झाले तर जबाबदारी कोण घेणार?" असा सवाल महापौरांनी केला.

शाळांवर महापौर म्हणाल्या...

"100 टक्के हजेरी शाळेत असणे गरजेचे नाही, त्यामुळे एक दिवस आड विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं आहे. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना काही गोष्टी समजून सांगायच्या आहेत. पालकांचे सुद्धा संमती पत्र शाळा घेत आहेत. एका बेंचवर एक विद्यार्थी शाळेत बसेल. खाजगी शाळांनी सुद्धा हे नियम पाळायचे आहेत. खाजगी शाळांची सुद्धा तपासणी केली जाईल"

loading image
go to top