भाजप-शिवसेना राड्यानंतर मुख्यमंत्र्यांची पदाधिकाऱ्यांशी भेट

उद्धव ठाकरेंची भेट म्हणजे शिवसैनिकांनी केलेल्या कृत्याचे समर्थन आहे का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा
भाजप-शिवसेना राड्यानंतर मुख्यमंत्र्यांची पदाधिकाऱ्यांशी भेट

मुंबई: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधणीसाठी खरेदी केलेल्या जमिनीत घोटाळा झाल्याचे आरोप आपच्या नेत्यांनी केले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून आपले मत व्यक्त केले. तसेच, अनेक शिवसेना नेत्यांनी याप्रकरणी काही वक्तव्ये केली. या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या गेलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाबाहेर फटकार आंदोलन केले. पण या ठिकाणी आंदोलन करून देणार नाही असं सांगत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेदरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्यांशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाईट वर्तणूक केली असा आरोप करत भाजपच्या एका महिला कार्यकत्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. तसेच, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी या विभागातील शिवसैनिकांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. (Sena Bhavan Fight between Shivsena BJP CM Uddhav Thackeray meet those party workers of Dadar Mahim Wadala)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर, माहीम आणि वडाळा विभागातील शिवसैनिक आणि पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांची पाठ थोपटली. शिवसेनेने या भेटीचे फोटो ट्विट केले असून, शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष प्रमुख एवढाच उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला आहे. शिवसेना भवनासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांना चोप दिल्यानंतर आज झालेली ही भेट वेगळेच संकेत असल्याचे दिसत आहेत. या भेटीने एकप्रकारे उद्धव ठाकरे शिवसैनिकांनी केलेल्या कृत्याचे समर्थन करत आहेत की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. पण 'कुणी अंगावर आले की शिंगावर घ्या', या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे शिवसैनिकांनी कृती केल्याने उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांच्या पाठीवर शाबाशकीची थाप मारली आहे, असा सूर शिवसैनिकांमध्ये दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com