esakal | #Breaking ज्येष्ठ अभिनेते रविराज यांचे वृद्धापकाळाने निधन
sakal

बोलून बातमी शोधा

#Breaking ज्येष्ठ अभिनेते रविराज यांचे वृद्धापकाळाने निधन

#Breaking ज्येष्ठ अभिनेते रविराज यांचे वृद्धापकाळाने निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मराठी, हिंदी, गुजराती चित्रपट आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रविराज (76) यांचे बुधवारी (ता. 18) विलेपार्ले येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍च्चात पत्नी उषा, मुलगा प्रितेश आणि मुलगी पूजश्री असा परिवार आहे. रविराज यांनी 25 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 

राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

रविराज यांचे खरे नाव रवींद्र अनंद कृष्णा राव होते. चित्रपटसृष्टीमध्ये रविराज या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. "आहट' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. तर राजा ठाकूर दिग्दर्शित "जावई विकत घेणे आहे' या त्यांच्या मराठी चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. नंतर रविराज यांनी "ओवाळिते भाऊराया', "तूच माझी राणी', "रूप पाहता लोचनी', "देवापुढे माणूस', "अजातशत्रू', "दोस्त असावा तर असा', "जावयाची जात', "नणंद भावजय', "भन्नाट भानू' आदी मराठी चित्रपट केले. "अन्यायाचा प्रतिकार' हा त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट होता. त्याचबरोबरीने "अचानक', "तीन चेहरे', "एक चिठ्ठी प्यार भरी', "चांद का टुकडा', "खट्टा मिठ्ठा' यांसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. "मेघनी रात', "गाजर नी पिपुडी', "जे पीड परायी जानी रे' आदी गुजराती चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. तसेच अभिनेते अशोक सराफ, मश्‍चिंद्र कांबळी यांच्याबरोबर रविराज यांनी "दिल्या घरी तु सुखी रहा' हे नाटक केले. त्यांनी या नाटकाचे शंभरहून अधिक प्रयोग केले. 

Senior actor Raviraj passes away