Video Viral : ज्येष्ठ नागरिक, जोडप्यांचा सन्मान; 100 वर्षांच्या आजोबांनी स्टेजवरच मारल्या उड्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Video Viral : ज्येष्ठ नागरिक, जोडप्यांचा सन्मान; 100 वर्षांच्या आजोबांनी स्टेजवरच मारल्या उड्या!

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये ७५ वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि लग्नाला ५० वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ जोडप्यांचा सन्मान करण्यात आला होता. या कार्यक्रमात १०० वर्षांच्या आजोबांनी आपला फिटनेस दाखवण्यासाठी चक्क स्टेजवरच उड्या मारून दाखवत साऱ्यांनाच अचंबित केलं.

आजोबांच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांचा हा डान्स पाहून कार्यक्रमात उपस्थित असलेले आमदार सुद्धा अचंबित झाले आहे. त्यांच्या डान्सचा प्रेक्षकांनी आणि उपस्थित पाहुण्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली आहे. तर या वयातील त्यांचा फिटनेस पाहून सगळेच थक्क झाले.

दरम्यान, अंबरनाथ येथील किणीकर विकास प्रतिष्ठान व जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी १०० पेक्षा जास्त वय असलेल्या आजोबांच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.